पुणे : नाभिक समाज नवचैतन्य संघ कर्वेनगर यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन मारुती भैरवनाथ मंदिर, कर्वेनगर येथे नुकतेच करण्यात आले होते. सोहळ्याचे हे २४ वे वर्ष असून या सोहळ्याचे उदघाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याच्या निमित्ताने ह. भ. प. अशोक महाराज मेमाणे यांनी प्रवचन तर ह. भ. प. कृष्णा महाराज पडवळ व ह. भ. प. दत्तात्रय महाराज दोन्हे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून नाभिक समाजाने एकत्रित राहावे हा संदेश दिला.
नाभिक समाज नवचैतन्य संघाचे संस्थापक अशोक सुरवसे, अध्यक्ष प्रभाकर सोनवले, उपाध्यक्ष अमोल दळवी, सचिव नितीन हिरे, खजिनदार दिनकर चौधरी, अशोक शिंदे, सारिका आढाव, सुषमा यादव, शीतल तावरे, शारदा गायकवाड, मंगल गवळी, सुनीता ननावरे आदी यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.