संत सेना महाराज यांची पुण्यतिथी

0

नीरा । येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पंचक्रोशीतील नाभिक समाजातील बांधवांनी एकत्र येऊन पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे वाटप केले. शनिवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नीरा पंचक्रोशीतील पिंपरे खुर्द, गुळुंचे, राख, निंबुत या गावातील नाभिक समाजातील नागरीक उपस्थित होते. नीरेतील विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातातील मान्यवरांनी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष अमोल रणदिवे व उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी सर्वाचे स्वागत केले.