‘संत सेना स्वच्छ माणूस अभियान’ द्वारे उभारली समाजगुढी

0

जळगाव । मराठी नविन वर्षानिमित्ताने शहरातील 31 बेवारस मनोरूग्णांना निराधारांच्या दाढि केस कापत अंघोळ स्वच्छतेने केली. अनोख्या पध्दतीने समाजसेवक सुमित पंडित व मायमाउली फाऊंडेशन यांनी जळगाव शहरात सर्व प्रथम ‘संत सेना स्वच्छ माणूस अभियान‘ची सुरवात केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन व विर शहिदांना श्रध्दांजली देत भारत मातेच्या जय घोषात भारत मातेला सलामी देऊन या अनोख्या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. यासाठी रेल्वे स्टेशन रस्त्यांवर ,पुलाखाली कुठेही बेवारस पडलेल्या निराधार, अपंग,रुग्ण किंवा मनोरुग्णांना शहरातील गायत्री मंदिर, हनुुमान मंदिर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे बेवारस अवस्थेत असणार्‍या मनोरुग्णांची दाढि, कटिंग व स्वच्छ अंघोळ करुन माणसात आणण्याचा समाजसेवक सुमित पंडित यांचा शहरात आगळा वेगळा ऊपक्रम पाडव्याच्या निमित्ताने बघण्यांसाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.

बेवारसांसाठी अंखड परिश्रम
सुमित पंडित यांनी औरंगाबाद पुर्ण मराठवाडा, खांन्देश विदर्भांत जाऊन व त्यांना शोधुन त्यांची दाढी- कटिंग करून अंघोळ घालून त्यांना नवीन कपडे घालत. तसेच प्राथमिक औषधोपचार करत 108 रुग्णवाहिकेला फोन करुन सरकारी दवाखान्यात दाखल करून त्यांची प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना स्वतः घरुन जेवणाचे डबे पुरवणे असे कार्य चालू आहे. आजपर्यंत 289 बेवारस लोकांना माणुसकीची मदत केली आहे. ललीतभाऊ शर्मा यांनी सुमित पंडित यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

रूग्णांना जेवणाची व्यवस्था
सुमित पंडित यांनी कित्येकांना मायेचा ऊब देत सांभाळ केला. तसेच बेवारस व्यक्तींचा अंत्यविधी सुद्धा केला आहे. जयराम रोकडे या व्यक्तीचा त्यांनी दोन महीन्याचा पुर्ण खर्च स्वतः केला. सुमित पंडित यांनी गोरगरिबांना वेळोवेळी रक्ताची मदत व एखादे पेशट लांबुन जर आले तर त्यांच्या जेेवणाची व्यवस्था लगेच च्या लगेच होत नसली तर अश्या वेळी पत्नी पुजा च्या सहकार्यांतून जेवणाचे डबे पुरवणे अशी सेवा सुरु असते.

यांचे लाभले सहकार्य
समाजसेवक सुमित पंडित, माय माऊली फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे , महाराष्ट्र नाभीक महामंडळ संपर्क प्रमुख राजकुमार गवळी, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम खोंडे, देविदास फुलपगारे, नारायण सोनवणे, अरुण वसाने, महारु ऐसी, आकाश सोनवणे, आकाश निकम, प्रकाश शिंदे, संजय सोनवणे, राजेंद्र खैरनार, नरेंद्र कोरडे, श्याम वाघ, आरपीएफ बाविस्कर, टीटीई ठाकुर, टीटीई पाटील, पीएसआय सोनवणे, रुचिता चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते.