तालुका बंजारा समाजातर्फे आयोजन; 8 तांड्यांचा एकत्रित सहभाग
शहादा- संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या वतीने पहिल्यांदाच तालुक्यातील 8 तांड्यांनी एकत्र येऊन जयंती उत्सव साजरा केला. सप्तशृंगी मतामंदिरा पासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला व पुरुष हे मुख्य आकर्षण ठरले होते. मिरवणुकीनंतर शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या पटांगणात चेनसिंग नायक यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला.
मुलींना जास्ती जास्त शिक्षित करा
प्रा.संजय जाधव, ठाणसिंग चव्हाण, हिम्मतराव वंजारी,अनिल भामरे, रघु जाधव, शिवा चव्हाण, रवी राठोड, कवरसिंग महाराज, धनसिंग जाधव, रामसिंग राठोड, हेमराज चव्हाण, प्रमोद जाधव, अमृत राठोड, लखा चव्हाण,अनिल राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचे अध्यक्ष चेनसिंग नायक यांनी मार्गदर्शन करतांना सांगेतले की आपला समाज हा शिक्षणाच्या दिशे पासून खूपच लांब आहे. समाजातील काही अनिष्ट रुढी परंपरांना फाटा देत. समाजाने नव्या दिशेकडे वळले पाहिजे. आपल्या समाजात महिलांना बरोबरीचे स्थान दिले पाहिजे मुलींना जास्तीत जास्त शिक्षण दिले पाहिजे. कारण एक मुलगी शिकली तर ती दोन कुटुंब शिक्षित करते. वसंतराव नाईक विदयलयाच्या माध्यमातून प्रा. संजय जाधव व त्यांच्या पत्नी प्रा. वर्षा जाधव ह्या अनेक गरीब विद्यार्थ्यांसाठी कायम मदद करतात ही समाजासाठी गर्वाची बाब आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमात प्रा. वर्षा जाधव , कवरसिंग महाराज, शिवा चव्हाण, अनिल भामरे, ठणसिंग चव्हाण आधींनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात मुलींना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचे, तरुणांना व्यसना पासून दूर ठेवण्यासाठी पर्यंत करणे, समाजातील काही अनिष्ट प्रथा सर्वानुमते विचार करून त्या येणार्या काळात कायमच्या बंद करणे अशे अनेक ठराव मांडून मंजूर करण्यात आले. या कार्यक्रमात मंदाणा, दुधखेडा, उजळोद, कानडी, भोरटेक, चिखली, निंभोरा, जयनगर, कुसुमवाडा व शहादा ह्या गावातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेंद्र चव्हाण यांनी केले.