संदिप पाटील यांना दर्जीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

0

जि.प.अध्यक्षा पाटील यांच्याहस्ते पारितोषिक

जळगाव । जिल्हा परिषद शाळा बिलवाडी येथील उपशिक्षक संदिप पाटील रांना 4 सप्टेंबर रोजी दर्जी फाऊंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यांना जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिक्षक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शालेय स्तरांवर विविध उपक्रम राबविणाच्या शिक्षकांना दर्जी फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील राया होत्या.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण, रावेर गटशिक्षणाधिकारी विजय पवार, प्रविण पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गोपाल दर्जी यांनी केले. संदिप पाटील यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध उपक्रम राबवित असतात. यात प्राथमिक शिक्षकाचा पहीला शैक्षणिक ब्लॉग तयार केला. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी विद्यार्थाचे पालकांना पत्र यासारख़े जनजागृतीवर उपक्रम घेतले. गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी आर.व्ही बिराडे, केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे आदींनी मार्गदर्शन केले.