संदीप युनिव्हर्सिटीतर्फे उद्या गुणगौरव सोहळा

0

जळगाव । स्वयं अर्थसहाय्यीत विद्यापीठाच्या स्थापनेसाठी येथील संदीप फाऊंडेशनने सरकारकडे दिलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळवून ‘संदीप विद्यापीठ’ याची स्थापना असून एकूण 120 हून अधिक कोर्सेस उपलब्ध करून दिले आहे. संदीप युनिर्व्हसीटीचे महाराष्ट्रात 10 केंद्र असून यातील उत्तर महाराष्ट्रात चार असून अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना 45 दिवसांसाठी परदेशातही पाठविण्यात आल्याची माहिती केंद्र समन्वयक अशोक महाजन व प्रा. कुणाल शिंदे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा करणार उद्या सत्कार
बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात 80 टक्केहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना सत्कार संदी युनिर्व्हसिटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम रविवार 25 जून रोजी सकाळी 10 वाजता शहरातील जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सत्कार सभारंभ कार्यक्रम होणार आहे. ‘प्रतिभा सन्मान‘ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रया कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह संदीप फाऊंडेशनचे प्रा. इंद्रजित सोनवणे, श्रीकांत गुंजाळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थिती राहणार आहे. तसेच ‘उच्च शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि चारित्र्य निर्माणात शैक्षणिक संस्थांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संदीप युनिव्हर्सिटी इन्फॉर्मशन सेन्टर, गजानन चेंबर, जळगाव 9168615802 येथे संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव केंद्र समन्वयक अशोक महाजन यांनी केले.