तळेगाव दाभाडे : पक्ष संघटनेने आपणास विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली, तर मी निवडणूक लढविण्यास सज्ज आहे, अशी इच्छा मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रविंद्र भेगडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मावळ प्रबोधिनीचे वतीने तळेगाव दाभाडे येथे दहीहंडीच्या कार्यक्रम निमित आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये भेगडे बोलत होते.
हे देखील वाचा
यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगर सेवक अमोल शेटे, देहूरोड कॅन्टोंमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, विनीत भेगडे, बंटी भेगडे, अवधूत पोंक्षे आदी उपस्थित होते. दहीहंडी कार्यक्रमाचे प्रसंगी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित स्वतंत्र सैनिक बाळासाहेब जांभूळकर, राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू नितीन म्हाळसकर, आंतरराष्ट्रीय कुंग फु खेळाडू संदीप कुंजीर तसेच दुर्ग संवर्धनासाठी सदैव काम कारण-या सह्याद्री प्रतिष्ठान, दुर्ग संवर्धन संथा, शिवदुर्ग यांचा सन्मान करण्यात येणार आहे.