भुसावळ । गाडी क्र. 12629 संपर्कक्रांती एक्सप्रेसने प्रवास करणार्या बीएसएफच्या जवानाची 7 हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी क्र. 12629 संपर्कक्रांती एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून यशवंतपूर ते निजामुद्दीन असा प्रवास करणार्या बीएसएफ जवान रमेशकुमार (जि. मलकांगीरी, ओडीसा) यांची बॅग अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना 14 मे रोजी सकाळी 8 ते 12 वाजे दरम्यान भुसावळ परिसरात घडली. बॅगेत ओळखपत्र, कपडे, एटीएम, पॅनकार्ड, एक मोबाईल असा 7 हजारांचा ऐवज होता. याबाबत रमेशकुमार यांनी निजामुद्दीन लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केला होता. त्यानुसार येथील लोहमार्ग पोलिसात गुन्हा वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हिरालाल जाधव करीत आहे.