जळगाव । राज्यव्यापी होणार्या शेतकरी संपाच्या तिसर्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी सरकारच्या विरोधात विरोधक रस्त्यावर उतरले आहे. शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी व राज्यातील सरकार करीत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अजून आंदोलने करण्यात येत आहे. शेतकर्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाचोरा येथील माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत व तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांचा मालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी चोपड्यात धरणगांव नाक्याजवळ सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून रास्तारोको करण्यात आला. तसेच तालुक्यातील वर्डी फाट्याजवळी अंकलेश्वर – बर्हाणपूर महामार्गावरही एक तास रास्तारोको केला. तर चाळीसगाव येथील रयत सेनेचे संपाला जाहिर पाठींबा दिला आहे.
पाचोर्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन
पाचोरा । संपूर्ण राज्यभरात शेतकर्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केला असल्याने शेतकर्यावर राज्यातील सरकार करीत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाचोरा येथे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली व तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय नाना वाघ, जिल्हा उपाध्यक्ष नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, तालुका युवक अध्यक्ष अरुण पाटील, शहराध्यक्ष मोतीलाल चौधरी, ए.बी.अहिरे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन प्रदीप पाटील, ज्येष्ठ संचालक डिगंबर पाटील, नगरसेवक वासु महाजन, आयुब बागवान, अॅड. दिपक पाटील उपस्थित होते. पाचोरा तहसिल कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे हारुण देशमुख, पं.स.सदस्य ललित वाघ, डॉ.पिंताबर पाटील, राजेंद्र महाजन, रणजीत पाटील, बाबाजी ठाकरे, प्रा. माणिक पाटील, शंकर बोरसे यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविला.
शेतकर्यांनी दुध, कांदे व टमाटे फेकले रस्त्यावर
माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले की, शेतकरी संपावर जाणार असल्याचे एक महिन्यापासून या शासनाला माहिती असतांना शेतकर्यांच्या विषयांची दखल शासनाने घेतली नाही. कर्जमाफीसाठीचा अभ्यास शासनाकडे नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. याची कल्पनाही नाही. सत्तेत असलेल्या शिवसेना कर्ज माफीसाठी अनेक दिवसांपासून त्यांचे मंत्री व आमदाराचे राजीनामे खिश्यात घालून फिरत आहेत. शिवसेनावाल्यांना खरोखरच शेतकर्यांची कळवळ असती तर त्यांनी सत्तेची तमा न बाळगता राजीनामे दिले असते. अनेक महिन्यांपासून शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली असती. आज शेतकर्यांवर एने पेरणीच्या तोंडावर संप करण्याची वेळ आली नसती.
यावेळी जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, तालुका अध्यक्ष विकास पाटील यांनीही राज्यातील युती सरकारचा खरपुस समाचार घेतला. विविध विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार सोना मगर यांना देण्यात आले. यावेळी बांबरुड (राणीचे) येथील ललित वाघ यांनी आणलेले दुध व आयुब बागवान यांनी आणलेले कांदे आणि टमाटे शिवाजी चौकात जाऊन रस्त्यावर फेकण्यात येवून संपास पाठिंबा दिला.
धरणगाव तालुका क्रांती मोर्चातर्फे आंदोलन व रास्ता रोको
धरणगाव । तालुका शेतकरी क्रांती मोर्चा तर्फे आंदोलन व रास्ता रोको आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर करण्यात आले कर्जमुक्ती व शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी दोन दिवसांपासून सुरु असलेले तिसर्या दिवशीही शेतकर्यांनी आंदोलन झाले. धरणगाव तालुका शेतकरी क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करतांना शेतकर्यांनी टमाटे, कांदे, भेंडी रस्त्यावर फेकली. तसेच रस्त्यावर दूधही ओतण्यात आले. या आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व चंदन पाटील, भिमराज पाटील, वाल्मिक पाटील, गोपाळ पाटील, ऋषीकेश चव्हाण, अमोल पाटील, कल्पेश महाजन, आबा पाटील, भुषण मराठे, मोहित पाटील, राहुल पाटील,भीमराज पाटील आबा पाटील गोविंदा पाटील आदींनी केले. जोपर्यंत शेतकर्यांचा सातबाराचा उतारा कोरा होत नाही तोपर्यंत शेतकरी क्रांती मोर्चा स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना शेतकर्यांतर्फे चंदन पाटील यांनी यावेळी केली.
5 रोजी जनआंदोलनतर्फे धरणे
चाळीसगाव । शेतमालाला योग्य भाव नाही शेतकर्यांना कर्ज माफी मिळावी, स्वामिनाथन आयोग व खंडित वीजपुरवठा यासारख्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकर्यांनी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि 1 जून पासून शेतकरी संपावर गेलेले आहेत. या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जनआंदोलन खान्देश विभागाच्या वतीने दि 5 जून 2017 रोजी सकाळी 10 वाजेपासून चाळीसगाव तहसील कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी हितासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जनआंदोलन खान्देश विभागाचे प्राध्यापक गौतम निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अंकलेश्वर – बर्हाणपूर महामार्गावर रस्ता रोको
चोपडा । तालुक्यातील वर्डी फाट्याजवळी अंकलेश्वर – बर्हाणपूर महामार्गावर एक तास रस्त्या रोको आंदोलन करण्यात आले, रास्ता रोको आंदोलनात एक ते दीड हजार शेतकर्यांचा प्रतिसाद मिळाला तसेच फडणवीस सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, लहूश धनगर, तुषार पाटील, विजय पाटील(माजी जि.प. सदस्य), अतुल ठाकरे, संजीव सोनवणे (वक्ते) पंचक्रोशीतील समस्त शेतकरी, मोठ्या प्रमाणात संपात सहभागी होते. तसेच शेतकर्यांचा मागण्याण्यांचे निवेदन तहसिलदार साहेब यांना देण्यात आले.
चोपड्यात शेतकरी कर्जमुक्तीसाठी सर्व पक्ष एकवटले
चोपडा । सपुर्ण कर्जमुक्ती, दुधाला पन्नास रूपये भाव यांचासह विविध मागण्यासाठी राज्यातील शेतकरी एक जून पासून संपावर गेला आहे संप यशस्वी व अक्रमक होत असल्याचे पाहुणे भाजप सरकार शेतकर्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकर्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकर्यांचा मालाला हमीभाव मिळाला पाहिजे यामागणी साठी आज चोपड्यात धरणगांव नाक्या जवळ सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्यात रास्तारोको केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा नेण्यात आला. या आंदोलनात कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, किसान क्रांतिचे एस.बी. पाटील, नगराध्यक्ष मनिषा चौधरी, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड. घनःश्याम पाटील, माजी जि.प. सदस्या इंदिराताई पाटील, कम्युनिष्ट पक्षाचे अमृत महाजन, मनसेचे अनिल वानखेडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, महेंद्र धनगर, आबा देशमुख, विकास पाटील, अमृतराव सचदेव, नगरसेवक जिवन चौधरी, प्रकाश राजपुत, राजाराम पाटील, बंटी पाटील, राजाराम पाटील, संजीव बाविस्कर, अॅड.एस.डी.सोनवणे, किशोर चौधरी, दिपक चौधरी, दिपक माळी, विक्की शिरसाठ, यांचासह शेतकरी, कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदी सामिल झाले होते.पोनि किसनराव नजन पाटील यांनी बंदोबस्त ठेवला.