संपामुळे पुण्यातील मार्केटयार्डात भाजीपाल्याच्या किमतीत 25 टक्क्याने वाढ

0

पुणे :- १ जून पासून देशभरात सुरू असलेल्या शेतकरी संप सुरु आहे. या संपामुळे पुण्यातील मार्केटयार्डात भाजीपाल्याची आवक 30 टक्क्यांनी घटल्याने परिणामी भाजीपाल्याच्या किमतीत 25 टक्के दरवाढ झाली आहे.

मार्केटयार्डमध्ये मालाची आवक घटली
देशभरात सुरू असलेल्या संपाची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली असावी. त्यामुळे पुण्यातील मार्केटयार्डमध्ये तरकारी मालाची आवक घटली. एरवी शेतमालाच्या 1350 गाड्या येतात त्यामध्ये घट झाल्याने आज फक्त 850 गाड्या दाखल झाल्या आहेत. संपकाळात भाजीपाल्याच्या किंमती वाढतील या शक्यतेने भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली. परिणामी किमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान मार्केटयार्डमध्ये शेतमाल विक्रीची चोख व्यवस्था असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी घेऊन यावे, असे आवाहन बाजार समिती प्रसासनातर्फे करण्यात आले आहे.