संपूर्ण गावाचे प्राण वाचावे यासाठी स्वत:चा जीव दिला

0

गांधीनगर-गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा परिसरात मंगळवारी मोठा अपघात झाला. या अपघातात भारतीय हवाई दलाचं ‘जॅग्वार’ हे फायटर विमान कोसळले आणि या घटनेत पायलट संजय चौहान हे शहीद झाले.

हवाईदलामध्ये एअर कमांडो पदावर कार्यरत असलेले संजय चौहान यांच्या ‘जॅग्वार’या विमानाने नियमित सरावासाठी जामनगर येथून उड्डाण घेतले होते. मात्र, काही काळातच या विमानाच्या दुर्घटनेची माहिती समोर आले. या अपघातात विमान पायलट संजय चौहान शहीद झाले. या अपघातावेळी संजय चौहान स्वत:चे प्राण वाचवू शकले असते. मात्र, एका नागरी वस्तीवर येणारे संकट टाळण्यासाठी त्यांनी स्वत:चे प्राण पणाला लावले.

अखेरपर्यत प्रयत्न

‘जॅग्वार’ ज्यावेळी कोसळत होते त्यावेळी ते एका नागरी वस्तीवर पडणार होते. मात्र, या वस्तीवरील संकट दूर करण्यासाठी संजय चौहान यांनी शेवटपर्यंत विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. खरे तर ते पॅराशूटच्या मदतीने स्वत:चे प्राण वाचवू शकले असते. मात्र, गावक-यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी अखेरपर्यत प्रयत्न केला. ते विमानात तसेच बसून विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत राहिले आणि यातच विमान कोसळून ते शहीद झाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी असलेले संजय चौहान हवाईदलामध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्यामुळे यातच त्यांचा मृत्यू झाला असून काही स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात काही जनावरांचा मृत्यू झाला असून या विमानाचे काही अवशेष दूरपर्यंत पसरले आहेत.