संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करा-नवाब मलिक

0
मुंबई – राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करुन जी कामे करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची झाली असून या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली.
ही जलयुक्त शिवार योजना भाजपच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आणण्यात आली असा आरोप करतानाच बीडमध्ये इतक्या खालच्या दर्जाचे काम करण्यात आले आहे की, लहान लहान बंधारे टिकत नाहीत. या बंधाऱ्याला लावलेले सिमेंट काठयांनी सुध्दा निघते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट झाले पाहिजे.शिवाय कामाची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी केली.  या योजनेचा नुसता प्रचार करुन करोडो रुपये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाटलेले आहे हे या निकृष्ट कामावरुन सिध्द झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.