गोलपारा: जळगाव जिल्ह्यातील फैजपूरजवळील चिंचोले येथील वऱ्हाडींच्या वाहनाला डंपरने दिलेल्या धडकेत १२ जण ठार झाल्याची घटना काल घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज आसामधील गोलपारा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला. यात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणारी एक प्रवासी बस येथील धूपधारा परिसरातील रस्त्यालगत असलेल्या दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.
जखमींमधील काहीची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. आसाममधील धुबरी येथून गुवाहाटीकडे ही बस निघाली होती. दरम्यान रस्त्यालगत असलेल्या एका विजेच्या खांबाला तिची धडक झाल्याने ती दरीत कोसळली. या दुर्घटनेत घटनास्थळीच सात जणांचा मृत्यू झाला.