संपूर्ण भारताला मोफत लस द्या – राहुल गांधी

नवी दिल्ली – संपूर्ण भारतल्या नागरिकांना केंद्र सरकारने मोफत लस दिली पाहिजे अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी भारतातील सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की यावेळी त्यांना ती मिळेल असे ट्वीट केले.  केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर, देशभरात अनेक ठिकाणी सध्या लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. यावर राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.