समता भ्रातृ मंडळाचा उपक्रम
पिंपरी : आरोग्य धनसंपदा योग वर्ग, कामगार कल्याण भवन व समता भ्रातृ मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संभाजीनगर परिसरामध्ये पिंपरी-चिंचवडकरांसाठी दि. 14 ते 21 जून दरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये योगा, प्राणायाम, ध्यान-धारणा यासाठी मोफत शिबिर होणार आहे. हे शिबिर कामगार कल्याण भवन इमारत, सुबोध विद्यालयासमोर, संभाजीनगर येथे पार पडणार आहे. सकाळी 5 ते 7 यावेळेत हे शिबिर होणार असून योगा मॅट, पाण्याची बाटली, नॅपकीन, छोटी डायरी, पेन हे शिबिरार्थींनी घेऊन यावे, असे समता भ्रातृ मंडळाचे रविंद्र बर्हाटे यांनी सांगितले.
योगा केल्याने अनेक फायदे होत असतात. योगामुळे ऊर्जा-स्फुर्ती मिळते, मनःशांती मिळते. कौटुंबिक ताण-तणाव नष्ट होतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आत्मविश्वास वाढतो, दिर्घायुष्य मिळते. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रविंद्र बर्हाटे-9850035817, प्रेमचंद शिंदे-9766735822, चंद्रलेखा काळे-9226340036, चंद्रकांत घाणेकर-9604049921, संदीप आल्हाट-9822631014, शांताराम पाटील-9923103482 यांच्याकडे संपर्क साधावा.