संभाजी उद्यानात ‘आर्टिस्टिक कॉर्नर’

0

लहानग्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून केली जागा

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ’अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या विद्यार्थ्यांनी बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन ,पुणे पालिकेच्या सहकार्याने टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक असा ’आर्टिस्टिक कॉर्नर’ संभाजी उद्यानात तयार केला आहे. पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून हा ‘आर्टिस्टिक कॉर्नर’ करण्यात आला आहे.  कॉलेजच्या बी-आर्च अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वाहनांचे जुने टायर, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून अनेक कलात्मक गोष्टी उद्यानाच्या कोपर्‍यात तयार केल्या आहेत.

प्लास्टिक बाटल्या, टायरचा वापर

त्यात रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करून झाडांना संरक्षणाचा पार तयार करण्यात आला आहे, वाहनांच्या जुन्या टायरपासून लांब सापाचे कुंपण, खेळण्यासाठी टायरची ‘जंगल जीम’ तयार करण्यात आली आहे. तसेच पुण्याची शिवकालापासून मेट्रोपर्यंत प्रगती दाखविणारी ग्राफिटी वॉल रंगविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य लीना देबनाथ, प्रा. अमीर पटेल यांनी मार्गदर्शन केले. ‘अर्बन-95’ अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला.