संभाजी भिडे यांचे वक्तव्यामुळे महिलांचा अपमान-सुप्रिया सुळे

0

पुणे-माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. या वक्तव्यावर आता सोशल मीडियावरही टीका होऊ लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास होताना आपल्याला दिसतो आहे आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारखी माणसे आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे, महिलांचा हा अपमान आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

माता होणे याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान असतो. मलाही तो आहे, मात्र संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमानच त्यांनी केला आहे असे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे या काल पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्ला बोल आंदोलन नसून डल्ला मारो असे विधान केले आहे. या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारी असून या पुढील काळात देखील राज्यातील अनेक भागात हल्ला बोल आंदोलन काढण्यात येणार आहे.असे सांगत भाजपला या हल्ला बोलचा त्रास होत असल्याने अशा प्रकारचे विधान केले गेले आहे.अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे च्या विधानाचा खरपूस समाचार घेतला