जळगाव । जिल्हा पोलिस दलातर्फे शनिवारी सकाळी 11 वाजता पोलिस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे पोलिस अधिकारी व कर्मचार्यांसाठी संभाषण कौशल्य विकास कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह हे होते. दरम्यान, जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले पोलिस निरिक्षक विलास सोनवणे यांनी कार्यशाळेत उपस्थितांना परिणामकारक संभाषण कौशल्य आणि परस्पर नाते संबंध विकसीत करणे या विषयावर सखोर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले की, पोलिस ठाण्यात येणार्या नागरिकांना, तक्रारदारांना तसेच पिडीत व्यक्ती यांच्याशी सन्मानाने वागावे तसेच त्यांचे समाधान होईल तो पर्यंत त्यांनी समजूत घालावी तसेच तक्रार घ्यावी. तसेच पोलिस दलाची प्रतिमा कशी उंचविता येईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.