प्रा.डॉ.किसन पाटील ; शिवचरण मधुकर फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय तापी-पूर्णा गुणगौरव पुरस्काराचे वितरण
मुक्ताईनगर- वाचन संस्कृतीचा र्हास होऊ न देता, वैचारीक गुलामगिरी टाळण्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची शिक्षण पद्धती अवलंबणे व अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा पेटवणे काळाची गरज असल्याचे मत प्रा.डॉ.किसन पाटील यांनी मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित शिवचरण मधुकर फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय तापी-पूर्णा गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान केले. अध्यक्षस्थानी लातूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव शशिकांत हिंगोणेकर होते. दरम्यान, भुसावळ येथील देशोन्नतीचे कार्यालयप्रमुख प्रेम परदेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी साहित्यिक तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ.शिवानंद भानुसे, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, नगराध्यक्ष नजमा तडवी, जिल्हा परीषद सदस्य वनिता गावडे, सुप्रसिद्ध लेखिका शोभा रोकडे, संध्या महाजन, कोल्हापूरचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक म.ग.गुरव, शिक्षणतज्ञ एस.ए.भोई, लेखक सुरेश पाचकवडे, प्राचार्य वि.आर.पाटील, डॉ.सुभाष बागल, अंकुर साहित्य संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तुळशीराम बोबळे, माजी सभापती राजू माळी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, डॉ.बी.सी.महाजन, भाजयुमोचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, महाराष्ट्राचे अंकुर साहित्य संघाचे सहसचिव सय्यद अहमद ,सुभाष ठोसर, एस.एम.उज्जैनकार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी केला गौरव
याप्रसंगी महाराष्ट्रातील 28 लेखक-लेखिका, पत्रकार, आदर्श शिक्षक यांना राज्यस्तरीय तापी-पूर्णा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीत प्रथम येणारे विद्यार्थी आणि मुक्ताईनगर, मलकापूर, बोदवड, नांदुरा, भुसावळ व रावेर तालुक्यातील सुवर्णकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवदेखील करण्यात आला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणार्या अमोल अनसुने यांचा एका हाताने टाळी वाजवण्याच्या कार्यक्रमदेखील या प्रसंगी सादर करण्यात आला तसेच प्राची पद्माकर तायडे आणि तेजस सुनील सोनार यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकार तर सूत्रसंचालन विनायक वाडेकर व सुरेश बोरसे यांनी केले तसेच आभार प्रा.गोडीवाले यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी प्रमोद पिवटे, संगीता उज्जैनकार, लेखक निंबाजी हिवरकर, जयवंत बोदडे, शिवाजी गोरले, जयश्री भोम्बे, राजेंद्र सावळे, छाया पिवटे, विजय शुरपाटण, गणेश बुडुखले, संतोष ठाकूर, किरण सावकारे, सुनीता वाडेकर, हकीम चौधरी, योगेश सोनार, गजानन बुडूखले, सुनील सोनार, सुनील मोरसकर, सचिन उज्जैनकार, सौरभ उज्जैनकार, अर्चना वराडे व फाउंडेशन च्या सर्व संचालक व आजीव सभासदांनी सहकार्य केले.