संमेलन 16 ते 18 फेब्रुवारीला

0

पुणे : गुजरातमधील बडोदा येथे होणार्‍या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा शनिवारी जाहीर करण्यात आल्या. सयाजीराव विद्यापीठात 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान हे संमेलन घेण्यात येणार आहे. बडोदा येथील हॉटेल सूर्या येथे दुपारी साडेतीन वाजता मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली.

बैठकीत संमेलनाच्या तारखा निश्‍चित करण्यात आल्या. संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. बैठकीस साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आणि स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीदेवी गायकवाड यांची उपस्थिती होती, अशी माहिती बडोदा मराठी वाङमय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर आणि प्रसिद्धी प्रमुख संजय बच्छाव यांनी दिली.