संयम बाळगण्याची निवडणूक आयोगाची सूचना

0

नवी दिल्ली । देशभरात सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रचार करताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून बोलताना जरा संयम बाळगा, असा सल्ला निवडणूक आयोगाने नेत्यांना सांगितले.

देशातील सर्व मान्यता पाप्त राजकीय पक्षांना आयोगाने पत्र पाठवून ही बाब सांगितली. नेत्यांनी आपल्या प्रचार सभेदरम्यान बोलताना आत्मसंयम बाळगणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे. आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही, ही बाब चिंताजनक असून त्याबाबत आयोगाला खंत आहे. जाती आणि धर्माशी निगडित भाषणे केली जात असल्याची माहिती आयोगाला मिळाली आहे. जाती आणि धर्माबाबत केलेली विधाने ही अशा ठिकाणांहून देण्यात आली आहेत, ज्या ठिकाणी आचारसंहिता लागू नाही, असेही आयोगाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.