संयुक्त अरब अमिरातीकडून केरळला ७०० कोटींची मदत !

0

थिरुअनंतरपूरम-केरळात काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. आता जराशी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून केरळला मदत मिळत आहे. दरम्यान जगभरातून देखील मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. संयुक्त अरब अमिराती (युएई)ने केरळला ७०० कोटींची मदत देण्याची घोषणा केली आहे असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले आहे.