संयुक्त कारवाई करुन वाळू तस्करीला आळा घालणार

0

जळगाव । जिल्ह्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होते.मात्र त्याला आळा बसत नाही.मात्र तस्करीमुळे नाहक बळी जातात. जिल्ह्यातील वाळूसाठ्यांवरुन होणार्‍या तस्करीस आळा घालण्यासाठी महसूल, पोलीस आणि परिवहन विभागांनी संयुक्तपणे कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दि.20 रोजी झालेल्या बैठकीत दिले.

प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे 15 पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात  झालेल्या बैठकीस पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपजिल्हाधिकारी महसूल अभिजीत भांडे पाटील व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील वाळूसाठ्यांवरुन होणारा अवैध उपसा, अवैध वाहतूक, त्यानुषंगाने होणारे गुंडगिरीचे प्रकार हे सगळे थांबविण्यासाठी महसूल, पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांचे संयुक्त पथक प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे तयार करण्यात आले आहे. या पथकात प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, परिवहन निरीक्षक, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, नायब तहसिलदार, मंडल अधिकारी आदींचा समावेश असेल.