संयुक्त जयंती उत्सवानिमित्त रंगल्या कुस्त्यांच्या दंगली

0

भुसावळ। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती व हनुमान जयंतीनिमित्त 21 मे रोजी खडका रोड, रजा टॉवर भागातील नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक 3 मध्ये सर्वधर्मीय राष्ट्रीय एकतेवर आधारीत भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बुटासिंग चितोडिया यांच्याहस्ते मल्लांची जोड लावून करण्यात आले. यावेळी पीपल्स रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, मुन्ना सोनवणे, प्रकाश अहिरे, मनोहर सुरडकर, राजू सुरडकर, मोहसीन खान, प्रमोद तायडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा झाल्या लढती
कुस्तीच्या प्रमुख लढतीत इंदौर येथील मल्हार आश्रम व्यायाम शाळेचे मल्ल सूरज चव्हाण यांनी लढत जिंकून हिरो ठरला. जावेद पहेलवान बर्‍हाणपूर, समद पहेलवान मालेगाव, गौरव शिंदे, आबा मेटकर-एरंडोल, कल्पेश मराठे, जळगाव, पवन पहेलवान-बर्‍हाणपूर आदींनीही जोरदार लढत दिल्या. स्पर्धेचे आयोजन भुर्‍या पहेलवान, बिसू पहेलवान, जुनेद खान, नरेश गेंडा पहेलवान, पप्पू पहेलवान व बाबा पहेलवान यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.