संयुक्त राष्ट्रांत पाक राजदूतांचा खोडसाळपणा उघड

0

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भाषणादरम्यान पाकिस्तानवर केलेल्या आरोपांना पाकिस्तानचे राजदूत मलीहा लोधी यांनी उत्तर देत भारताविरोधातच उलट्या बोंबा मारल्या. यावेळी त्यांनी चक्क पॅलेस्टिनींच्या हल्ल्यात बळी गेलेल्या एका महिलेचे छायाचित्र काश्मीरची महिला म्हणून दाखवत काश्मिरी जनतेवर भारत कशा प्रकारे अत्याचार करीत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, लोधी यांचा हा खोटारडेपणा काही वेळातच उघड झाल्याने पाक तोंडघशी पडले. 17 वर्षीय राविया अबू जोमा या मुलीचे हे छायाचित्र असून माध्यमांनी हे छायाचित्र अनेकवेळा दाखवले आहे. गाझा पट्ट्यात 2014 मध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान या मुलीच्या चेहर्‍यावर जखमा झाल्या होत्या. पुरस्कार विजेते छायाचित्रकार हैदी लेविन यांनी रावियाचे हे छायाचित्र काढले होते.