संरक्षणमंत्र्यांनी दोन तास भाषण ठोकले मात्र माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही-राहुल गांधी

0

नवी दिल्ली- राफेल करारावरून मोदी सरकारवर सातत्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून हल्ला सुरु आहे. त्यांनी पुन्हा मोदी सरकारला लक्ष केले आहे. आज राहुल गांधींनी भारतातील प्रत्येक नागरिकांना पंतप्रधान मोदींना व त्याच्या मंत्र्यांना राफेल बाबत प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आहे.

काल राफेलवरून निवेदन करतांना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन तास भाषण केले मात्र माझ्या प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिले नाही असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. राहुल गांधींनी ट्वीटरवर संरक्षण मंत्र्यांसाठी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहे.