भुसावळ । आयुध निर्माणीचे खाजगीकरण करण्याच्या दृष्टीने येथील आयुध निर्माणीतील 16 प्रकारचे उत्पादन नॉन कोअर गृपमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात देशातील 17 आयुध निर्माणीतील एकूण 143 प्रकारचे उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयुध निर्माणी विरोधी धोरणाचा ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनतर्फे गुरुवार 29 रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या आदेशाने देशातील सर्व 41 आयुध निर्माणीत भारत सरकारचा निषेध आंदोलन सुरु आहे. यावेळी शासनाच्या धोरणाविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संसदेवर साखळी उपोषण करणार
पुढील टप्प्यात पावसाळी अधिवेशनादरम्यान संरक्षण कर्मचारी 3 जुलैपासून संसदेवर साखळी उपोषण करणार आहे. विनोद तायडे, नितेश तायडे, प्रविण पाटील, प्रविण मोरे, दिपक वाघ, आशिष मोरे, विनोद धांडे, रवी सपकाळे, दिपक आंबोडकर, मोहन सपकाळे, जितू मोरे, लतेश वारुळकर, नाना जैन, किशोर बढे, जितू आंबोडकर, राजू निकम, संदिप सोनवणे, पंकज बडगुजर, दिपक भिडे, मिलींद ठोंबरे यांसह निर्माणीतील एस.सी./एस.टी. असोसिएशननेदेखील मोर्चाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.