भुसावळ- संरक्षण क्षेत्रातील देशव्यापी संपाला बुधवार, 23 पासून सुरूवात होत आहे. संरक्षण क्षेत्रातील 41 आयुध निर्माणीतील चार लाख कर्मचारी त्यात सहभागी होत असून भारत सरकारच्या संरक्षण धोरणाविरोधातील निती विरोधात संरक्षण क्षेत्रातील एआईडीईएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएसच्या संघर्ष समितीद्वारे तीन दिवसीय संपाची हाक देण्यात आली आहे. भुसावळ ऑर्डनन्सच्या सर्व कर्मचारी, अधिकारी व स्टाफने संपात सहभागी व्हावे, असे आवाहन एआईडीईएफचे उपाध्यक्ष व कामगार नेते कॉ.राजेंद्र झा यांनी केले आहे. दरम्यान, एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अजय एल.इंगळे व महासचिव डॉ.देवानंद उबाळे यांनीही संपात सहभागाचे आवाहन केले आहे.