रावेर । तालुक्यातील केर्हाळे येथील भोकर नदीपात्रालगत संरक्षण भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात भोकर नदीला पूर येत असल्यामुळे काठावरील घरे, शेती शिवार आणि स्मशानभूमीच्या रस्त्याचे नुकसान होत असे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी नदीपात्रालगत संरक्षण भिंतीचे काम व्हावे, अशी मागणी केली जात होती.
स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याचे रुंदीकरण
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे संरक्षण भिंतीच्या कामाला गती मिळाली. तसेच गेल्या महिनाभराच्या कालावधीत हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संरक्षण भिंतीलगत भराव टाकला असून, स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. संरक्षण भिंतीवर डबर पिचिंगच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होते? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी ग्रामपंचायतीतर्फे पाठपुरावा केला जात आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.