संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक

0

चिनी हॅकरचा हात असल्याचा संशय

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले असून, या संकेतस्थळावर चिनी लिपीतील अक्षरे दिसत आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ चीनने हॅक केल्याची शक्यता बळावली असून, या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली होती.

हॅकिंगची चौकशी सुरु!
संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हॅक झाले. संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर ’मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स’ ही अक्षरे इंग्रजीत आणि ’रक्षा मंत्रालय’ ही अक्षरे हिंदीत दिसत आहेत. पेज ओपन केल्यावर त्यावर ’एरर’ दाखवत असून, चिनी लिपीतील अक्षरेही दिसत आहेत. त्यामुळे चीनने हे संकेतस्थळ हॅक केले की अन्य कुणी? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. लवकरच संकेतस्थळ पूर्ववत होईल. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून पावले उचलले जातील, असे ट्वीट सीतारामन यांनी केले. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक करण्यामागे चिनी हॅकर्स असल्याचे बोलले जात होते, त्या दिशेनेही संरक्षण मंत्रालयाने तपास सुरू केला होता.