नवी दिल्ली: गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री भाजप नेते स्व.मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ संरक्षण मंत्रालयाअतर्गत असलेल्या The Institute for Defence Studies and Analyses’ (IDSA) चे नामकरण करणार आहे. या संस्थेला Manohar Parrikar Institute for Defence Studies and Analyses असे नाव देण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.
मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना देशाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ते आजारपणातही नियमित काम करत होते. त्यांनी आजारपणातही कामाला प्राधान्य दिल्याने त्यांचे कौतुक होत होते.