शहादा । पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार व शिवार भेट योजनेच्या शुभारंभासाठी आलेल्या भाजप नेत्यांच्या जिभा पुन्हा घसरल्याचा प्रकार संवाद यात्रेत घडला. ‘साले’ ही तिकडची भाषा असली तरी हा शब्दप्रयोग या नेत्यांच्या मानगुटीवर चांगलाच बसला आहे.
दानवेंचेही शब्द तेच; रोख अन्यत्र
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यात कार्यविस्तार योजनेचा कालपासून प्रारंभ झाला. यावेळी नांदरखेडा या गावात शेतकरी शिवार संवाद यात्रा झाली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांसाठी शासन राबविण्यात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. याच सभेत त्यांनी साला या शब्दांचा प्रयोग केला, पण तो शेतकर्यांऐवजी दुसर्यांसाठी होता.
स्वाभिमानीचे काळे झेंडे
दरम्यान दानवेंचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. नंदुरबार येथे दानवे यांना विरोध करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.