प्रतिष्ठानतर्फे रद्दी संकलनातून शैक्षणिक मदत
पिंपरी : संवाद युवा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त संकल्प चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पोलिस निरिक्षकविठ्ठल कुबडे, चिंचवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक साळुंखे, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक व ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ चिंचवडे, पोलिस वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, राजीव गांधी योजनेचे सदस्य गोपाल बिरारी, सामाजिक कार्यकर्ते बिभीषण चौधरी व घर बचाओचे समन्वयक विजय पाटील, रेखा भोळे, सामाजिक कार्यकर्ते योगेश चिंचवडे आदी उपस्थित होते.
संवादचे काम कौतुकास्पद
याप्रसंगी वरिष्ठ पोलिस निरिक्षक कुबडे म्हणाले की, संवाद युवा प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेला पेपर रद्दी संकलनातून गरीब मुलांचे शैक्षणिक साहित्य घेऊन त्यांना शिक्षणाकरिता हातभार लावत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप गौतम बागुल यांनी केला. कार्यक्रमाला संवाद युवा प्रतिष्ठानचे स्वयंसेवक प्रदीप पटेल, माऊली जगताप, रामचंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, भगवान निकम, सचिन महाले, प्रवीण महाजन, राजेंद्र निकम, गौतम बागुल, राजेंद्र नेटकर, कैलास रोटे, प्रदीप नेहते, वसंत नारखेडे, अरविंद महाजन, रवी ढाके, योगेश महाजन सचिन वाणी आदी उपस्थित होते.