संविधानवादी विद्यार्थी आघाडीतर्फे निषेधमोर्चा

0

जळगाव । ‘गौरी लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक व डाव्या विचारसरणीच्या खुल्या समर्थक असलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी संध्याकाळी घराच्या दारातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी जळगावात संविधानवादी विद्यार्थी आघाडीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. या निवेदनात गौरी लंकेश, दाभोळकर, पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी विचार्‍यांच्या लोकांची अश्या प्रकारे हत्या करणे म्हणजे आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. ही लोकशाहीची मुस्कुटदाबी आहे.

या घटनेचा निषेध व्यक्त करुन लंकेश यांच्या हल्लेखोरांना तात्काळ शोधून त्यांना शिक्षा करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे
या निर्घृण हत्येचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत असून, सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. जळगावात देखिल संविधानवादी विद्यार्थी आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मू. जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चात सहभागी नागरिक व विद्यार्थांनी हातात निषेधाचे फलक होते. आय एम गौरी, हींसेच्या राजकारणा विरोधात निषेध यात्रा, गौरी लंकेश अमर रहे असे लिहलेले फलक होते. तसेच नरेंद्र दाभोळकर, पानसरे यांच्या प्रतिमांचे देखिल फलकांचा समावेश होता. मोर्चा स्वातत्रचौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्या ठिकाणी तहसिलदार अमोल निकम यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात प्रा. डॉ. सी. पी. लभाणे, प्रा. देवेंद्र इंगळे, शितल पाटील, कुमारी भालेराव, सागर नाईक, तुषार सुर्यवंशी, विकास वाघ यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.