संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार प्रत्येकाने बजवावा

0

भुसावळ । भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि ही लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार करत असतात. मतदानाचा हक्क हा एक पवित्र अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनी केले. भुसावळ विधानसभा क्षेत्रातील पात्र व नवमतदार नोंदणी करण्याचे काम भुसावळ येथील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने प्रा. धिरज पाटील यांनी पार पाडले. शासनाच्या मतदार नोंदणी अभियानात त्यांनी मार्गदर्शन केले. ‘सर्वांनी मतदार नोंदणी करून, हे अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहनही प्राचार्य सिंह यांनी केले. युवाकांसाठी मतदानाचा हक्क महत्त्वाचा आहे, युवापीढी देश घडवण्याची शक्ति ठेवतात, याची जाणीव डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याँना करून दिली. कार्यक्रमाला वुमन्स डेवलपमेंट सेलप्रमुख प्रा. सुलभा शिंदे, प्रा. धिरज पाटील, विजय विसपुते तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नव मतदारांनी भरलेले अर्ज प्रा. धिरज पाटील व विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांच्याकडे सुपुर्द केले.