संविधानामुळेच मिळाली खरी लोकशाही

0

रावेर । जगातील सर्वात पवित्र संविधान भारतात असून यामुळेच नागरिकांना खरी लोकशाही मिळाली आणि ती डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी मिळून दिली असून समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या अधिकार देऊन बुध्दी कौशल्यासोबत जगाच्या पाठीवर जाण्याचा अधिकार ज्या थोर पुरुषामुळे मिळाला त्यांना सदैव आपल्या ह्रदयात ठेवा असे प्रतिपादन मधुकर सहकारी कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी केले.

क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन
कमलाबाई हायस्कुलच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रकाश मुजुमदार, सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी आदी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ नेमाडे, सुनील पाटील, महेश चौधरी, नगरसेवक आसिफ मोहम्मद, शेख सादिक, प्रकाश अग्रवाल, शारदा चौधरी, संगीता घेटे, दीपक घेटे, विक्रम बोरकर, सी.एच. पाटील, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, ग्रामसेवक शिरतोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश घेटे तर सूत्रसंचलन चतुर गढे यांनी केले.