भुसावळ। गौतम बुद्ध ते आधुनिक भारत या संपूर्ण इतिहासात बाबासाहेबांनी मनुस्मुर्ती ते भारतीय संविधान यांची सांगड घालत बहुजनांना अधिकार आणि संधी, त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. आम्ही आमच्या महापुरुषांना जाती जातीत विभागून घरी नेले परंतु संविधान घरी नेलेच नाही. आमचा देश कोण्या एका धर्म ग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो. जो पर्यंत आम्ही संविधान डोक्यात घेत नाही तो पर्यंत आम्ही एक राष्ट्र होऊ शकत नाही. आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत आणि अंतीही भारतीय आहोत हा बाबासाहेबांचा संदेश आम्ही कदापि विसरता कामा नये. असे प्रतिपादन प्रमुख वक्ता कपिल सरवदे यांनी केले. दीपनगर विद्युत केंद्रात महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता माधव कोठुळे, प्रमुख वक्ता म्हणून पुणे येथील विचारवंत कपिल सरवदे तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्य अभियंता नितीन गगे आणि कार्याध्यक्ष कल्याण अधिकारी पंकज सनेर हे उपस्थित होते. प्रास्ताविक समिती सचिव अमित बोरकर यांनी केले. अधिक्षक अभियंता सी.एल. निमजे यांनी मनोगत व्यक्त केले.
दीपनगर वसाहतीत रंगल्या कुस्त्यांच्या आम दंगली
तसेच आम दंगल कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. उपमुख्य अभियंता एल.बी. चौधरी आणि नितीन गगे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत धुळे, कन्नड, रावेर, वरणगाव, भुसावळ, रसलपूर आदी ठिकाणांहून आलेल्या पहेलवान यांनी सहभाग घेतला. कुस्ती स्पर्धेसाठी अधिक्षक अभियंता राजेश राजगडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि कुस्ती संघाचे तालुका सचिव प्रशांत निकम, भुसावळचे बाबा पहेलवान, वरणगावचे नामदेव पहेलवान आणि बब्बुभाई तेलंग यांनी विशेष सहकार्य केले.
यांची होती उपस्थिती
मुख्य अभियंता माधव कोठुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सिमा कांबळे यांनी केले. आभार सुरेश कांबळे यांनी मानले. सल्लागार समितीचे सर्व अधिक्षक अभियंता एम.पी. मसराम, व्ही.एम. बारंगे, एन.आर. देशमुख, एम.बी. पेटकर, सी.एम. निमजे आणि एम.बी. अहिरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. मनिष चौरे, अष्टपाल सोनोने, सुरेश कांबळे, विजयेंद्र साबळे, नितीन सोनवणे, प्रशांत वाघ, छगन पवार, गिरीश शेंडे, अनिरुध्द खोब्रागडे, उमेश सुरडकर, सतीश मिंधे, रोशन वाघ, सुनिल तायडे यांनी सक्रीय सहभाग घेतला. जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार, मिलिंद खंडारे, चंद्रकांत सपकाळे, अख्तर तडवी, ए.टी. उघडे यांनी कार्यक्रम आयोजनात
महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विविध स्पर्धा उत्साहात
वसाहतीमधील मुला मुलींसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्न मंजुषा, बेटी बचाव बेटी पढाव विषयावर निबंध स्पर्धा तर कला गुणांना वाव देण्यासाठी बुगी-वुगी 2017 या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 16 रोजी राजेश पवार लिखित आणि चंद्रकांत जाडकर दिग्दर्शित फलाट क्र.2 हे स्थानीय अधिकारी कर्मचारी आणि बाल कलाकार अभिनित नाटक सादर करण्यात आले. नाटकात रेल्वे फलाटावरील कचरा वेचणारी मुले, रेल्वे स्टाफ, कुली, अपराधी, प्रवासी यांचे फलाटावरील जीवन दाखविण्यात आलेले आहे.