संविधानामुळे रुजली समता, बंधूतेची मुल्ये!

0

भुसावळ । संविधानाने देशातील नागरीकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार समता, बंधुता ही मूल्ये रूजवली. लोकशाही राज्य संविधानामुळे मिळाले असून प्रत्येक नागरिकाला मालकी हक्कही मिळाल्याचे प्रतिपादन समतादूत शिल्पा मालपुरे यांनी केले. बार्टीमार्फत वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व डी.एस.चौधरी विद्यालयात संविधान जागर रॅली काढण्यात आली.

संविधानाचे मूल्य अंगीकारण्याचे केले आवाहन
या रॅलीचे आयोजन बार्टी संस्थेच्या समतादूत शिल्पा मालपुरे यांनी केले होते. रॅलीत संविधानाच्या घोषणा देत जी.एस.चौधरी विद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. समतादूत शिल्पा मालपुरे यांनी संविधानावर मार्गदर्शन करीत संविधानाने प्रत्येकाला देशाचे मालक संविधानाने केले. समानतेची संधी मिळाल्याने तळागाळातून सर्व नागरीकांना समान संधी प्राप्त झाली तसेच संविधान हा देशाचा आत्मा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात संविधानाचे मूल्य अंगीकारण्याचे आवाहन केले. प्रसंगी मुख्याध्यापक रमेश महाजन, के.आर.निकुंभ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.