देहूरोड : भाजप सरकार हे भारतीय संविधानाला हात लावत आहेत. आरएसएसच्या रिमोटवर चालणारे भाजप सरकार संविधानाला धक्का लावण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपचे काही मंत्री त्याबाबत वारंवार गरळ ओकत आहेत. अशा सरकारला आता जनताच उलथुन टाकेल, असे प्रतिपादन पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांनी येथे केले. कवाडे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव भीमा ते दादर चौत्यभूमी संविधान सन्मान लाँग मार्च काढण्यात आला अहे. मार्चचा पहिला मुक्का देहूरोड येथे होता. यावेळी येथे झालेल्या स्वागत सभेत कवाडे यांनी प्रतिपादन केले. यावेळी बुध्दविहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमीन शेख, रामदास ताटे, परशुराम दोडमणी, अरूण जगताप, धर्मपाल तंतरपाळे, अशोक गायकवाड, संगिता गायकवाड यांनी या लाँग मार्चचे स्वागत केले. यावेळी झालेल्या स्वागत सभेत सध्याच्या राजकिय व सामाजिक परिस्थितीबाबत मनोगत व्यक्त केले.
धर्मांध शक्तींचे स्तोम माजले
कवाडे यांनी पुढे सांगितले की, धर्मांध शक्तींचे स्तोम माजले असून सरकारचे सूत्रधार जातीय दंगली घडविण्याच्या प्रयत्नात आहेत. आगामी काळात संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले रचले जात आहे. अशा प्रवृत्तींचे मनसुबे जनता उधळवून लावील. त्यासाठी बहुजन समाजाने आता जागे होऊन संघटित झाले पाहिजे. टेक्सास गायकवाड यांनी सरकारच्या कामगिरीवर जोरदार टिका केली. आगामी कॅन्टोन्मेंट निवडणुकीत सातही वॉर्डात निळा झेंडा फडकेल. पण तरूणांनी त्यासाठी एकसंघ व्हावे लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत पैसे घेऊन मते विकु नयेत, असे आवाहन शेख यांनी केले.