जळगाव – संविधानाला तडीस नेण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांनी केले. दोन वर्ष ११ महिने आणि १७ दिवस चाललेला हा संघर्ष राहीला. विविध जातीधर्माच्या देशात सगळ्यांना न्याय देणे सोपे नव्हते. पण प्रत्येक क्षेत्रात विविध जाती, धर्माच्या,पथांच्या लोकांना सामावून घेण्याच काम डॉ. बाबासाहेबांनी केले. पण प्रत्येक जण भिती निर्माण करतंय आम्ही धक्का लावू, बोट लावू तर एवढी सोपी गोष्ट नाही. तुमच्याआमच्या पुरते नाहीये. या देशात ३० टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचाही विचार करा. दलित, मुस्लीम इतर सोडाच पण आम्ही जर सगळे लटकलो तर जे हात लावतील ना त्यांचे हात उखडून टाकण्याची ताकद आमच्यात असल्याचा इशारा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज संविधान दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात दिला.
संविधान जागर समितीतर्फे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, या देशात बरेच लोक वेगवेगळ्या अफवांना ऊत घालून या देशात अराजक निर्माण झालेली असल्याचे चित्र निर्माण करीत आहे. पण बारीश ना होती तो खेती ना होती, और बाबासाहेब ना होते तो समता ना होती. बाबासाहेबांनी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे बारा बलुतेदार लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचेही काही चुकीचे दाखले देण्यात लोकांनी कमतरता केली नाहीये. हे तर बाबासाहेब आहेत आणि बाबासाहेबांनी दिलेल्या गोष्टी आहेत त्या अंमल कराव्या लागत आहे. बर्याच लोकांनी राज्यातही तेच चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. गणपती बाप्पा टाकून बसले काही पाण्यात. डोंबरीचा खेळ सुरू आहे. कधी ती पोरगी खाली पडेल अन् कधी तीच्याशी लग्न लावीन असं डोंबारीला वाटत त्यापध्दतीचे चित्र राज्यात निर्माण केले जात असल्याचा टोला भाजपाला लगावला. त्याकाळातही एक अफवा खातं असायचं. अफवा म्हणजे एखाद्या रोडवर अपघात होतो आणि सर चारही गेले एकपण नाही वाचला. म्हणजे गावात जिथे हिंदु-मुस्लीम थोडाही वाद झाला की लगेच झाली असे जे अफवा खाते आहे, लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.