संविधान जगात आदर्श -दीपक पाटील

0

शहाद्यात संविधान रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर सभा

शहादा- स्वातंत्र्यानंतर भारताने प्रभावशाली संविधान तयार केले आहे. संविधानाची चौकट कोणीच मोडू शकत नसल्याने ती संपूर्ण जगात आदर्श ठरली असल्याचे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी सांगितले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित संविधान सन्मान रॅलीच्या पार्श्वभूमीवरील सभेत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी कवि वाहरु सोनवने,जि.प सभापती आत्माराम बागले,वनसंरक्षक अधिकारी सुरेश मोरे,सेवानिवृत्त वनसंरक्षक नामदेव पटले,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर,माजी नगरसेवक सुपडू खेडकर,नगरसेवक नाना निकुंभ,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ,आदिवासी एकता परिषदेच्या वनिता पटले,कृऊबाचे उपसभापती रविंद्र राऊळ,अलका जोंधळे,रा.कॉ चे अनिल भामरे,शिवाजी मोरे,धनराज ईशी,भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे,अनिल कुवर,ग्रामसेवक ब्राम्हणे,संदीप रायते,संजय निकुंभे,प्रविण देसले,ड.डी.एन गुलाले ,सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी मोहन शेल्टे,शिवाजी महाले आदी उपस्थित होते.

जातीभेद करणार्‍यांना बळी पडू नका
पाटील म्हणाले, संविधानाची किमया आशी आहे की ती कोणीही मोडू शकत नाही.संविधानात सर्वच घटकांसाठी सोय केली आहे.कारण अराजकता माजणार नाही.स्वातंत्र्या पूर्व खाजगी कायदे चालत स्वातंत्र्यानंतर प्रभावी संविधान तयार केली आहे. डॉ.बाबासाहेब संपूर्ण देशाचे आहेत.जातीभेद करणारे करतील आपण त्यांना बळी पडू नका.आपले शहादा हे शांत प्रिय शहर आहे शहरात कोणतेही गालबोट लागणार नाही कारण शहरात सर्व बंधूभावाने वागतात त्यामुळे शहरात जातीय वाद होणार नाही यात शंका बाळगु नये. यावेळी अनिल कुवर,नामदेव पटले,वनिता पटले,सुनिल पाटोळे,तात्याजी पवार,प्राचार्य महमूद खाटीक ,प्रा.मनोज गायकवाड आदींनी मनोगते व्यक्त केलीत. प्रास्तविक दादाभाई पिंपळे यांनी केले .सुत्रसंचलन विष्णु जोधळे यांनी केले. संविधान सन्मान रॅली महात्मा ज्योतिबा फुले स्मारक पासून काढण्यात आली बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा मार्गाने क्रुषि उत्पन्न बाजारम समितीच्या शेड मध्येरॅलीचे सभेत रुपांतर झाले. रॅलीत सविधान पुस्तकाची मिरवणूक कढण्यात ाली. यात आदिवासी ढोल नृत्यासह महामानवाचा जयघोष करण्यात आला.