बौद्ध समाजबांधवांनी दिले पोलीस प्रशासनाला निवेदन
फैजपूर- दिल्लीतील जंतर मंतरवर 9 ऑगस्ट रोजी आरएसएसचे कार्यकर्ते श्रीनिवास पांडे गुरुजीसह त्यांच्या सहकार्यांनी भारतीय संविधानाची प्रत जाळत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी फैजपूर शहरातील बौद्ध समाजबांधवांच्या वतीने शहरात रविवारी संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आर. एस. एस. कार्यकर्ता श्रीनिवास पांडे गुरुजी व व त्यांच्या सहकार्यांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक शब्दाचा वापर केला आहे. वरील दोन्ही मुद्दे देशाविरोधातील कृत्य आहे. तसेच संविधानाची प्रत जाळत असलेला व्हिडीओ लाईव्ह दाखवला आहे. यामुळे देशातील शांतता भंग पावत असल्याने त्यांच्यावर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अश्या समाजकंटांकडून देशाच्या सार्वभौमतेला व एकात्मतेला धोका आहे. हे लक्षात घेवून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत देखील गुन्हा नोंद व्हावा व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना कडक शासन व्हावे अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद आहे. फैजपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन देण्यात आले.
यांचा मोर्चात सहभाग
यावेळी शाम मीना भानुदास, आत्माराम तायडे, सुमित साळुंके, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, शेख कुर्बान, माजी नगरसेवक मनोज कपडे, भारिप शहराध्यक्ष अमर मेढे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष दीपक काटे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अशोक भालेराव, अमोल मेढे, नीरज मेढे, दादू मेढे, भूमेश मेढे, चंद्रगुप्त मेढे, पवन मेढे, शेख जहांगीर, दीपक हिवरे, भूषण मेढे, चेतन मेढे, योगेश मेढे, अंकुश इंगळे, अजय मेढे, शुभम कोचुरे, राजू वाघ, चेतन गाढे, रुपेश जाधव यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.