शहादा। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहले आहे ते बदलण्याचे कोणातही सामर्थ्य नाही.सर्व जातीच्या लोकांना न्याय देण्याचे काम संविधानाने केले आहे.जोपर्यंत डॉ.आंबेकरांचे संविधान आहे तोपर्यंत देशाचे कोणीच तुकडे करु शकत नाही. ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे तुकडे जनता केल्याशिवाय राहणार नाही असे केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सांगितले .येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आ.उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, राम साळुंके, राष्टवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी, सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर पाटील, कॉ.माणक सुर्यवंशी,नगरसेवक मकरंद पाटील, कार्यकारी अभियंता झेलसिंग पावरा,जि.प सदस्य जयपालसिंह रावल,समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटीया, माजी उपसभापती बापू जगदेव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक दादा जगदेव, जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, पो.नि शिवाजी बुधवंत आदी उपस्थित होते.
सुंदर पूर्णाकृती पुतळा
शहरात डॉ.आंबेडकरांचा सुंदर पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे,पूर्णाकृतीसारखे सर्वांनी मने करावीत.शहराच्या विकासाला साथ द्यावी.राजकारणात सर्वांशी माझे संबंध चांगले आहेत.त्यामुळे शहरातील ज्या योजना प्रलंबीत असतील. त्यामार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन.भाजप हा पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही.सबका साथ सबका विकास या धर्तीवर पक्ष काम करीत आहे.त्यामुळेच सरकार सोबत आहे.इंदु मिलचा प्रश्न निकाली निघून तेथे डॉ.आंबेडकरांचे भव्य स्मारक साकारले जाणार आहे.आ.पाडवी म्हणाले,शहाद्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहला जाईल एवढ्या सुंदर पुतळ्याचे अनावरण झाले आहे.नंदुरबार जिल्ह्यालाला न्याय दिला जात नाही.दलित वस्ती सुधारणासाठी पाच कोटीचा निधी केंद्राने द्यावा.डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी शेडची गरज असून ते बांधकामाकाकरीता दहा लाखांचा निधी देत आहे.
समतेचा संदेश रुजल्याशिवाय देशाचा विकास नाही
पुढे बोलतांना ना.आठवले म्हणाले की,समतेचा संदेश सर्वाच्या मनात रुजल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही.सर्वत्र परिवर्तन होत असले तरी काही भागात दलितांवर अत्याचार होत आहेत.ते थांबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.अन्यायग्रस्त मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे.डॉ आंबेडकरांनी देशासाठी कार्य केले आहे.शाळेत सर्वात मागे बसणारा विद्यार्थी कोलंबीया विद्यापीठात 18 तास अभ्यास करुन महान झाला.ते म्हणजे डॉ .आंबेडकर.ते या देशाचे उध्दारक होते.सिंचनाचा अभ्यास त्यांनी केला होता.नदीजोड प्रकल्पावर त्यांनी भर दिला.जगभरातल्या 100 महान पुरुषांच्या यादीत डॉ.आंबेडकर पहिल्या पंक्तीत आहेत.ते आणखी 10ते12 वर्ष राहिले असते तर भारताचे राजकारण बदलून देशाचे पंतप्रधान झाले असते.डॉ.आंबेडकर कुठल्या उच्च जातीच्या विरोधात नव्हते.उलट त्यांना त्यासमाजातील मोठ्या लोकांनी मदत केली म्हणून संविधान लिहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
डॉ.आंबेडकरांचा पुतळा प्रेरणादायी
दीपक पाटील म्हणाले,शहादेकरांची इच्छा पूर्णाकृती पुतळ्यामूळे पूर्ण झाली.सर्वांच्या सहकार्याने पुतळा उभारला गेला.शांततामय शहर म्हणून ख्व्याती होती.परंतु काही दिवसांपासून गालबोट लावले जात आहे.पून्हा शांतताप्रिय शहरासाठी डॉ.आंबेडकरांचा पुतळा प्रेरणादायी ठरणार आहे.अशांतता पसरविणार्याना सद्बुद्धी मिळणार आहे.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले,शहराच्या सौंदर्यत पुतळ्यामुळे भर पडली आहे.यामुळे चांगल्या विचारांची प्रेरणा मिळणार आहे.नगराध्यक्ष पाटील म्हणाले,प्रेरणादायी पुतळा शहरात उभारला आहे.उत्साह भरपूर आहे त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.प्रास्तविक अरविंद कुवर यांनी केले तर ना.आठवले यांनी मनोगताची सांगता शैलीदार कवितेने केली.