संशययामुळे पतीने केली सरपंचपत्नीची हत्या

0

रत्नागिरी – महिला सरपंचाची हत्या तिच्याच पतीने केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोनाली जाधव असे या महिला सरपंचाचे नाव आहे. सोनालीच्या पतीने तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे.

सोनाली जाधव या कादवड गावाच्या सरपंच आहेत. त्यांचा पती दीपक तुकाराम जाधव हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याच रागातून आज पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने सोनाली जाधव यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्त्या केली. याप्रकरणी त्यांची मुलगी किरण दीपक जाधव हिने अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सध्या आरोपी दीपक जाधव याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे.