संशयितांच्या शोधार्थ पथक नागपुरला रवाना

0

जळगाव । भरूच(गुजरात) येथून कापसाच्या गाठी घेऊन निघालेला ट्रक चोरी करून तो जळगावात अवघ्या दीड लाख रुपयांत विकण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना आता पर्यंत चार जणांना अटक करण्यात यश आले असून इतर दोन संशयितांच्या शोधार्थ शनिवारी सकाळी पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुर येथे दोन संशयितांच्या शोधार्थ पथक पाठविण्यात आले आहे.

दोन संशयित आहेत अद्याप फरार
भरूच(गुजरात) येथून कापसाच्या गाठी घेऊन निघालेला ट्रक चालकाने गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याची बाब समोर येताच एमआयडीसी पोलिसात चालकाला लागलीच अटक केली होती. त्यानंतर ट्रकची तोडणार्‍या व ट्रकचा भंगार खरेदी करणार्‍यांना अशा आणखी तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सध्या चौघेही पोलिस कोठडीत आहेत. याप्रकरणातील सुरेश यादव व फिरोज खान जाफरउल्ला खान रा. नागपुर हे दोन संशयित अद्याप फरार आहेत. संशयितांना लवकर अटक व्हावी, यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन खंडागळे यांच्यासह तीन पोलिस कर्मचार्‍यांचे पथक नागपुर येथे शोधार्थ गेले आहे.