संशयिताचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला 

0
जळगाव : चाळीसगावच्या मेजर कॉर्नर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुसर्‍याच्या नावावर असलेली चार दुकाने भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेचे ( बीएचआर ) अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांनी बनावट करारनामा करून बीएचआरकडूनच 25 लाख रुपये डिपॉझिट उचलले होते. या प्रकरणी तिघांच्या विरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील कल्पना प्रमोद रायसोनी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी मंगळवारी अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
चाळीसगाव येथे स्वत:च्या संस्थेसाठी भाड्याने घेतले आणि त्यानंतर ही चारही दुकाने मूळ मालक सुनिता जगन्नाथ वाणी यांच्याकडून सन 2006 मध्ये खरेदी केले.बनावट करारनामा करून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शाखेच्या कर्मचार्‍याने रायसोनी,कल्पना रायसोनी आणि सरव्यवस्थापक माळी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कल्पना रायसोनी यांनी न्यायाधीश पटणी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज मंगळवारी फेटाळला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. अकील इस्माईल यांनी कामकाज पाहिले.