संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0

जळगाव। लग्नाची आमिष दाखवून लग्न न केल्यामुळे दादावाडी येथील तरूणीने 2 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणातील संशयित तरूणाने न्या. के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्या. अग्रवाल यांनी आज गुरूवारी फेटाळून लावला आहे.

2 जानेवारी रोजी स्नेहल जावरे या तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. यानंतर तरूणीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून प्रसाद दिपक नंद या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित प्रसाद याने न्या. अग्रवाल यांच्या न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. यावर आज कामकाज होवून न्या. अग्रवाल यांनी संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे प्रविण भोंबे यांनी कामकाज पाहिले.