जळगाव । फसवणुकीच्या प्रकरणी गुन्हा दाखल नसतांना संशयीतातर्फे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच फसवणुक झालेल्या तक्रारदाराने तालूका पोलिस ठाण्यात पुराव्या निशी लेखी तक्रार दिली याबरोबर वरीष्ठ अधिकार्यांनी गुन्हा दाखल करण्याचे सांगीतले, त्यानंतरही तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. मात्र गुन्ह्यात संशयीत म्हणुन नाव असल्याने जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचा अर्ज
स्वप्नाली अनिल बाविस्कर व पती अनील बाविस्कर या दाम्पत्याची अक्षय गृहनिर्माण सोसायटी आहे. संस्थेच्या मालकीचा अव्हाणे शिवारात प्लॉटनं. 13 ते 20 ब्लॉक नऊ खरेदीदाराने विकत घेतली आहे. या प्रकरणात खरेदी खत नोंदवतांना संशयीत विजय भिकनराव सोनवणे याने संस्थेत कुठलाही पदाधिकारी नसतांना 7/12 उतार्यात एकमेव मालक दाखवुन विक्री केला आहे. हि बाब मुळ मालक संस्थाध्यक्ष यांनी रितसर काढलेल्या उतर्यावर संस्थेने कर्ज घेतल्याचे आढळून आली. या मिळकतीवर 1 कोटी 73 लाख 31 हजार 50 रुपये पशासनाचा बोझा असल्याचे निष्पन्न झाले. म्हणुन संस्थेतर्फे 19 डीसेंबर 2016 रोजी आरोपीची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची तक्रारी अर्ज देण्यात आला होता, मात्र या प्रकरणी गुन्हाच दाखल झालेला नाही. तरी सुद्धा संशयीत म्हणुन विजय भिकनराव सोनवणे याने जिल्हा व सत्र न्यायायलायात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. आर.जे.कटारीया यांच्या न्यायालयात कामकाज होवुन न्यायालयाने संशयीताचा अर्ज आज फेटाळून लावला आहे. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. केतन ढाके, फिर्यादीतर्फे अॅड. प्रकाश पाटील, बचावपक्षातर्फे अॅड. आर.ई पाटील यांनी कामकाज पाहिले.
दोघांचे अटकपूर्व तर एकाचा जामीन फेटाळला
जळगाव। विशाल उर्फ भय्या राजेंद्र सोनवणे याला काही तरूणांनी मारहाण करून त्याच्यावर चाकुहल्ला चढविला होता. यानंतर चाकुहल्ल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी संदिप उर्फ पप्पु यशोद अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, संदिप याने जामीन मिळावा यासाठी तर दिपक संतोष पाटील व किरण उर्फ पिंटू यशोद यांनी अटकपूर्वसाठी न्या. आर.जे.कटारीया यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज गुरूवारी कामकाज होवून न्या. कटारिया यांनी दोघांचे अटकपूर्व तर संदिप याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.