जळगाव। जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतील अनियमित कर्जप्रकरणी दाखल गुन्ह्यात एका संशयिताने अतिरीक्त सत्र न्यायाधीश चित्र हंकारे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेला अर्ज गुरूवारी फेटाळला आहे.
या प्रकरणात माजी आमदार सुरेश जैनांसह चौघांना 24 एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या संचालक आणि कर्जदारांच्या विरोधात अनियमित कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यातील कर्जदार राजेश रामकृष्ण कपूर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न्यायाधीश हंकारे यांनी गुरूवारी फेटाळला आहे.