जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील चंडिकावाडी शिवारातील शेताच्या संदर्भात काका पुतण्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात 9 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका संशयिताने न्या.कटारीया यांच्या न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज शनिवारी फेटाळला आहे. चाळीसगाव तालुक्यातील चंडिकावाडीत 8 जून 2015 रोजी शेतीच्या वादातून कैलास बाबूसिंग राठोड (वय 50) आणि तानाजी चंदू राठोड या काका पुतण्यांना 9 जणांनी मारहाण केली होती.
या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी आठ संशयितानी अटक केली होती. तर बाबू हरजी राठोड हा संशयीत अजून फरार आहे. त्याने न्यायाधीश कटारीया यांच्या न्यायालयात दाखल केलेला अर्ज शनिवारी फेटाळला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.